कविता संग्रह: शारदेय (भाग1) - कपिल नवले

कविता संग्रह: शारदेय (भाग1) - कपिल नवले

1. आठवण

स्मरते जेव्हा आठवण तुझी
येतात त्या सर्व स्मृती मन:चक्षूसमोर

आपण सोबत घालवलेले ते क्षण
आपल्या त्या सर्व आठवणी

साद घालतात मनात जेव्हा
असह्य होते जगणे तेव्हा

हवा हवासा वाटतोस तु
मला दिलेल्या नि:स्वार्थी प्रेमामुळे

एकत्र आपण यावे वाटते मला
त्या जुन्या आठवनी उजळवण्यासाठी

परत यावे वाटतात ते दिवस
आपण हसत खेळत घालवलेले

समजते मला
आता तू नाहीस म्हणुन

पण मन माझे
हे एकायला तयार होत नाही

सारखे वाटत असते मनाला माझ्या
तू इथेच आहेस म्हणुन

भेटशील पुन्हा केव्हातरी
रोज या आशेत रहातो मी

2. कविता

शब्दरुपी कविता ही
अक्षराच्या समुद्रातून

अर्थरुपी गाभ्यासह
गहन आशय घेऊन

आकर्षक रचना करुन
स्पष्ट विचार मांडून

कल्पनेचा मुक्तसंचार करुन
कवित्वाची कसोटी देऊन
रहावी स्मरणात टिकून

३ स्वप्न असावित कशी

स्वप्न असतात, आशा आकांक्षा पूर्ण करणारी
स्वप्न असतात, भावना पुलकित करणारी
स्वप्न असतात, सत्यात सहसा न घडणारी
स्वप्न असतात, भावविश्व निर्माण करणारी
स्वप्न असतात, दुरावलेल्यांना जवळ आणणारी
स्वप्न असतात, नव्या कल्पना मांडणारी
स्वप्न असतात, असाध्य गोष्टी साध्य होताना बघणारी

लेखक: कपिल नवले, औरंगाबाद
मोबाईल: 8459526141 / 8888893548
ईमेल: kapilnawale@yahoo.com


comments powered by Disqus