साउथचा सिनेमा: रण्णा - अक्षता दिवटे, बंगलोर

साउथचा सिनेमा: रण्णा - अक्षता दिवटे,  बंगलोर

adivate484@gmail.com 7483619155

दिवस एकामागून एक कसे निघुन गेले कळलेच नाही. आमच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली. पण अस वाटत की जणू कालचीच घटना आहे.

तशी मी मराठी मुलगी कॉलेज संपले आणि आमच्या घरच्यांनी माझे लग्न लावुन दिले. गंमत अशी की माझ्या नवऱ्याला मराठी येत नव्हते कारण ते कर्नाटकाचे अणि मला कन्नड येत नव्हते. आम्ही संभाषणासाठी नेहमी हिंदी भाषेचा वापर करायचो. लग्न होऊन सहा महिने झाली तरी आमचे हे नेहमी कामात गुंतलेले असायचे. आमच्या घरी मी अणि हे आम्ही दोघेच. त्यामुळे मला फार कंटाळा यायचा.
एका रविवारी सकाळी आमचे हे लॅपटॉप वरती काम करत असताना मला हाक मारली.

ते : चाय बनाओ.
मी पटकन चहा बनवला आणि चहाचा कप त्यांच्यासमोरच्या टेबलावर आपटला.
आज माझा मूड थोडा खराब आहे ओळखून ते म्हणाले
क्या हुआ? क्या बात है!
मी : आप कभी मुझे घुमाने ले के नही जाते हो. घर मे बैठके बोअर हो जाती हु मै!
ते : आप को पता है ना सारे फॅक्टरी की जिम्मेदारी मुझपे है! चलो कोई बात नाही… आज शाम को सुदीप की राण्णा पिक्चर देखेंगे.

बोलल्या प्रमाणे त्यांनी दोन तिकीट बूक केली. थेटर मध्ये ईतकी गर्दी होती की बापरे” कधी एकदाचा पिक्चर चालु होतोय अस वाटत होतं.

Bangalore मध्ये पहिल्यांदा मी पिक्चर बघणार होते. आजूबाजूला खूप लोक होती. अणि सुदीप चा प्रचंड कटआउट लावला होता त्यावर फुलांच्या मोठमोठ्या माळा. सुदीप चे फॅन कटआउट वर दुधाचा अभिषेक करत होते. हा काय प्रकार चालु आहे ते मला समजत नव्हते. मी माझ्या मिस्टरांना विचारलं ते म्हणाले.
साऊथ इंडियन पिक्चर मे ये सब कॉमन है! डोन्ट वरी.
थेटर चा एन्ट्री गेट ओपन झाला. आम्ही आत गेलो. पिक्चर चालु झाला.

हा एक असा पिक्चर आहे की जिच्यामधे मनोरंजन, कुटुंबातील प्रेम, अणि सेंटिमेंट आहे.

हा पिक्चर चालू होतो तो एका श्रीमंत विभागलेल्या कुटुंबापासून. कुटुंबातील मुलगी सरस्वती एका गरीब वकीलाशी गुपचूप लग्न करते. हे तिच्या वडिलांना सहन होत नाही त्यामुळे ते मुलीशी असणारे सर्व नाती तोडतात. या घटनेला जवळजवळ 25 वर्षे उलटली पन याचा पश्चाताप त्यांना होत असतो. त्यांचा नातू सुदीप (कन्नड सुपरस्टार सुदीप) त्यांना वचन देतो की सरस्वतीला परत घेऊन येईन.

आजोबांना दिलेल्या वचनाप्रमाणे तो आपल्या सरस्वती आत्या ला शोधतो. अणि सरस्वती आत्या खुप जिद्दी असतात. सरस्वती आत्या चा राग शांत करण्यासाठी व त्यांना परत घरी घेऊन जाण्यासाठी त्याला आत्याच्या घरात शिरण्याचा एक मोका हवा असतो. जेव्हा सरस्वती आत्या घर सोडुन आल्या होत्या तेव्हा सुदीप लहान होता. आता मोठेपणी तो कसा दिसतो ते सरस्वती आत्या ना माहीत नसते. या गोष्टीचा फायदा घेऊन तो ड्रायवर चंदू बनून आत्याच्या घरी एंट्री घेतो. सरस्वती आत्या च्या दोन मुली असतात. मोठ्या मुलीवर त्याला क्रश होतो. मोठ्या मुलीच्या रोल हरिप्रिया (प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री) यांनी केला आहे. अणि छोट्या मुलीचा रोल (रचिता राम) यांनी केला आहे. सुदीप ड्रायवर म्हणुन काम तरी मिळवतो पण कोणती गाडी पेट्रोल वर चालते कोणती डिझेल वर हे त्याला माहीत नसते. आत्याच्या घरच्यांनी भाजी आणायला सांगितले तर कोणत्या भाजी ला काय म्हणतात हे त्याला माहीत नसते. त्यासाठी सुदीप एक बॅकअप टीम तयार करतो.

सरस्वती आत्या कर्जबाजारी झालेल्या असतात कर्ज चुकविण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढत जातो त्यासाठी त्यांना आपली हॉटेल विकावी लागतात. पण सुदीप जाऊन मारामारी करून हॉटेल परत मिळवतो. काही दिवसातच सुदीप ला कळते की अत्याची मोठी मुलगी दुसऱ्या मुलावर प्रेम करते अणि त्या मुलाचे लग्न ठरलेले असते. ज्या घराण्यातील मुलीबरोबर आत्याच्या मोठ्या मुलीच्या प्रियकराचे लग्न ठरलेले असते ते घराने गुंडगिरी घराने असते. रात्री सुदीप त्या मुलाला आणायला चाललेला असतो तेव्हा आत्याच्या छोट्या मुलीला संशय येतो की एवढ्या रात्री हा गाडी घेऊन जात आहे नक्कीच हा चोर आहे.

गडबडीत तिचा पाय घसरतो तिच्या डोक्याला मार लागतो आणि ती त्याच्या गाडीत पडते. जेव्हा सकाळी ती उठते तेव्हा तिला काहीच आठवत नसते. (पिक्चर मध्ये हा सीन मला खूप आवडला) सुदीप त्या मुलाच्यालग्नात जातो आणि लग्नातुन मोठया मुलीच्या प्रियकराला पळवून आणतो. नंतर त्याला कामावरून काढून टाकले जाते. छोट्या मुलीचे लग्न ठरवले जाते. त्याचवेळी अचानक सुदीप च्या आजोबांची तब्येत बिघडते. काय करावे हे त्याला सुचत नसते. त्याला फक्त एक चान्स हवा असतो अणि नशिबाने त्याला तो मिळतो. त्या चान्स चा वापर तो कश्या पद्धतीने करतो. सरस्वती आत्याच्या छोट्या मुलीला कसे प्रेमात पाडतो. त्याच्या आई समान असणाऱ्या सरस्वती आत्याला परत घरी कसा घेऊन येतो हे सांगण्यापेक्षा बघण्यात खूप मनोरंजक आहे.

प्रेम हे खूपच पावित्र्य असते. प्रेम करा पण आई वडिलांवर, भाऊ बहिणीवर, कॉलेज मधे टाइमपास म्हणुन कुणावर प्रेम करू नका. जर प्रेम केलेच तर लग्ना साठी आई वडिलांची मान्यता घ्या. उगाच पळुन जाणे गुपचूप लग्न करून आई वडिलांना दुखवू नका. आज काल पळुन जाणे फॅशन बनले आहे. ज्या आई वडिलांनी ईतक्या वर्षे तुमचे पालन पोषण केले त्यांना दुखवून तुम्ही कधीही सुखी राहू शकत नाही. हा या पिक्चर चा सारांश आहे.


comments powered by Disqus