नवी जाणीव - भारत उपासनी, नाशिक

नवी जाणीव  - भारत उपासनी,  नाशिक

प्रत्येक श्वास घेऊन उठतो आहे.
एक शब्द. एक कविता. एक नवी जागृती.
प्रत्येक श्वास आणि क्षण आतुर.
शब्दबद्ध होण्यासाठी.
पहिली कविता स्फुरण्याच्या आधी काय होतं ?
शेवटची कविता स्फुरण्याच्या नंतर काय असेल ?
कविता संपेल का ?
मग कवितेच्या पुढे काय राहील ?
कदाचित माध्यम संपृक्त झाल्यावर.
ते आपोआपच बदलेल.!
ते बदलणं आवश्यकच ठरेल.
नव्या जाणीवांसाठी.!


comments powered by Disqus