चारोळ्या: पानगळ - अभिलाषा देशपांडे, डोंबिवली

चारोळ्या: पानगळ - अभिलाषा देशपांडे,  डोंबिवली

abhilashardeshpande@gmail.com
7045948961

१ ) येता शिशीर हा धावून
होते सा-याचीच तारांबळ
फुलतो तो बहरून पळस
पण झाली जागोजागी पानगळ

२) आला शिशीराचा वारा
पानगळ सुरू झाली
गेला कचरा वा-याने
नवी पालवी फुटली

३) येता शिशीर दारी
पाने टाकती कात
गुलमोहर पिवळा भारी
फुलून सजतो त्यात

४) नव देण्याच्या
निसर्गाचा अलंकार
वठलेल्या मनाला
नव तिचा शृंगार
५) पालन निसर्गाचे
नवीन फुटे पालवी
गळती तृप्ततेने
चक्र कौतूके चालवी

६) चक्र निसर्गाचे पानगळ
गळतील पाने पिकली
त्या पानावरही प्रेम करावे
हिरवी असताना दिली सावली

७) शिशीराच्या पानगळीशी
नाळ जोडलेली
पालवी फुटता
स्पंदने दाटलेली

८) आला शिशीर ऋतू
पानगळ झाली
नवी पालवी येणार
पानफुले येती तरू

९) कुडीतून प्राण जाता
उरतो हा देह नश्वर
जरी पानगळीत पाने झडती
वृक्षाला येतो पून्हा बहर

१०) पानगळ हवीच हो
जुने जीर्ण लया जाते
घ्यावया त्यांची ती जागा
नवीन काही उद्या येते


comments powered by Disqus