कविता: आस - मयुरी घाग

कविता: आस - मयुरी घाग

साजिरे रूप तुझे, बघुनी बावरते मन माझे,
तुझे या विश्वात येणे, जणू माझे आयुष्य खुलून जाणे,

तुझ्या चेहऱ्यावरील गोड हसू, क्षणोक्षणी आता लागे मला भासू,
आस आहे या जगी तू येण्याची, विरंगुळा क्षणात तुझ्यात मी रमून जाण्याची,

सगळ्यांना तू बांधून ठेवशील, घरावर तर ताबा मिळवशील,
बोबडे बोलून सर्वांचे मन जिंकशील, घरात नवे चैतन्य आणशील,

इवल्या इवल्या पाऊलाने या घरात तू चालशील, घराचे तू या गोकुळ करशील,
मोठी होशील तू जेव्हा, येशील तू माहेरपणासाठी तेव्हा,

माझ्या श्वासाहून तू मला कमी नाही, सदा तुझे नाव आता माझ्या मुखी राही,
या वास्तवात तू येण्याची आतुरता आता वाढली, माझ्या विश्वात तू माझी सोनपरी बनली….

मयुरी विजय घाग


comments powered by Disqus