दीपावली

दीपावली

सनातन संस्था, महाराष्ट्र

धनत्रयोदशी (धनतेरस)

दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिनाचे महात्म्य, या दिवशी करायच्या कृतीमागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया.

१. तिथी आश्विन वद्य त्रयोदशी

२. भावार्थ

‘ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजन करतात. येथे ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो.

३. वैशिष्ट्ये

अ. व्यावहारिक

हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते.

आ. आध्यात्मिक

या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून राहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे. त्यामुळे साधना करणार्‍या जिवासाठी हा दिवस ‘महापर्वणी’ समजला जातो.

४. महत्त्व

अ. या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.

आ. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै-पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम १/६ भाग प्रभुकार्यासाठी व्यय करावा, असे शास्त्र सांगते.’

– प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

इ. या दिवशी श्री विष्णूच्या अप्रकट शक्तीच्या आधारे श्री लक्ष्मीची उजवी नाडी कार्यरत होऊन त्यातून उत्पन्न होणार्‍या तेजतत्वात्मक लहरी वेगाने ब्रह्मांडाकडे झेप घेतात. लक्ष्मीतत्वाच्या उजव्या नाडीच्या कार्यरत अवस्थेमुळे या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातील वायूमंडल हे सोन्यासारख्या चमचमणार्‍या सोनेरी कणांनी उजळून निघालेले असते. या चमचमणार्‍या सोनेरी कणांतील श्री लक्ष्मीचे चैतन्य जिवाला मायेतील ऐश्वर्य प्रदान करून त्याच्या साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करते; म्हणून या दिवशी धनाच्या रूपात श्री लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. श्री लक्ष्मीच्या भावपूर्ण पूजेमुळे प्रत्यक्ष धनाच्या अधिपतीचे, म्हणजेच कुबेराचे पृथ्वीच्या कक्षेत आगमन होते.

ई. पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून खाली करायचे. तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता आणि राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते. राजाचा खजिना हा जनतेचा असून राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देतांना आडकाठी न करता देत असे. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. ‘सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आत्मबलही वाढत असे.

५. पूजन

अ. धन्वंतरि जयंती

श्री धन्वंतरि देवता

धन्वंतरि जन्म

‘धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्‍या हातात ‘जळू’, तिसर्‍या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरि करतो.’ – आधुनिक वैद्य श्री. राम लाडे, लोकजागर, नोव्हेंबर २०१०comments powered by Disqus