प्रवासापूर्वीचा प्रवास! - आशिष अरुण कर्ले

प्रवासापूर्वीचा प्रवास! - आशिष अरुण कर्ले

लेखाचं शीर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रवासापूर्वीचा प्रवास म्हणजे नेमकं आहे तरी काय? प्रवासासाठी पूर्वतयारी म्हणून आपण बरेच काही करतो, मग अगदी नियोजनापासून ते प्रवासाचा दिवस येईपर्यंत सामान भरण्यापर्यंतची तयारी! पूर्वी आपल्याला जर एखाद्या नवीन ठिकाणी जायचं असेल तर ज्याने कोणी आधी त्या ठिकाणी प्रवास केला आहे त्यांचे अनुभव, एखाद्याने लिहून ठेवलेले प्रवासवर्णन या सर्वांद्वारे आपल्याला माहिती मिळायची… पण ही माहिती तशी थोडी मर्यादित असायची, पण आजकाल माहिती तंत्रज्ञानामुळे एखादा प्रवास हा प्रत्यक्षात करण्यापूर्वी तो डिजिटल स्वरूपात प्रवास होऊन जातो… आणि मग आपण जे काही पाहतो मग ते फोटो असतील, युट्युब वरील व्हिडिओ असतील या सर्व माध्यमातून त्या ठिकाणाला पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचते. गुगल मॅप च्या सहाय्याने आपण त्या ठिकाणाचे फोटो पाहू शकतो इतकेच नव्हे तर हल्ली आपण 360 अंश स्वरूपात तेथील त्रिमितीय (3D) स्वरूपातील फोटो पाहू शकतो… यापूर्वी प्रवास केलेल्या व्यक्ती, लोकल गाईड यांच्या कमेंट वाचून आपल्या शंकांचे निरसन करू शकतो इतकेच नव्हे तर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते तिथे विचारून तज्ञांकडून त्याची उत्तरे देखील घेऊ शकतो. आपण प्रवास करण्याचे ठिकाण जरी प्रत्यक्षात पाहिले नसले किंवा तिथे गेलो नसलो तरी देखील आजूबाजूची सर्व माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते अगदी तिथे जाण्याचा मार्ग मार्गामध्ये असणारे उपहार गृह भेट देणारे ठिकाणाच्या जवळ असणारे विश्रामगृह इत्यादी सर्व माहिती आपल्याला एका क्लिक वर उपलब्ध होते आणि ही सर्व तंत्रज्ञानाचीच कमाल! आणि हाच आहे आपला प्रवासापूर्वी चा प्रवास जो जरी आभासी स्वरूपातील असला तरी तो निश्चितच आपला खरा प्रवास सुखकर करण्यासाठी मदत करतो!

गुगल मॅपच्या माध्यमातून आता आपण केलेल्या प्रवासाच्या ठिकाणांबद्दल आपला अभिप्राय नोंदवून शकतो, आपण काढलेले फोटो व्हिडीओ तिथे अपलोड करू शकतो इतकेच नव्हे तर आपण आतापर्यंत किती प्रवास केला आहे याची नोंद देखील त्या ठिकाणी केली जाते.

हल्ली युट्युबवर कित्येक युट्यूबर्स प्रवासाचे त्यांचे अनुभव शेअर करतात जसे की सफर मराठी, रानवाटा, जीवन कदम हे सर्वजण गडकिल्ले वेगवेगळी पर्यटन स्थळे याची त्यांनी केलेली सफर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पुढे म्हणतात शिवाय त्या ठिकाणाला कशी भेट देऊ शकतो याबद्दल तपशीलवार माहिती देतात या सर्व गोष्टींमुळे आपल्याला घरबसल्या प्रवास होतोकित्येकदा असं होतं की प्रवासासाठी आपण नियोजन करतो परंतु काही कारणांमुळे आपला प्रवास मात्र होऊ शकत नाही परंतु या आधुनिक युगातील तंत्रज्ञानामुळे प्रवासापूर्वी चा प्रवास केल्यामुळे या ठिकाणाला भेट देणार आहोत त्या ठिकाणाला पाहण्याची ओढ ही आणखीनच वाढते व आता नाही तर नंतर नक्की जाऊ असा दृढनिश्चय देखील होतो…

असा हा आहे प्रवासापूर्वी चा प्रवास! मी तर कुठेही जाण्यापूर्वी असा प्रवासापूर्वीचा प्रवास करतो जो निश्चितच खऱ्या प्रवासात फक्त मार्गदर्शक नव्हे तर लाभदायक देखील ठरतो.

[ लेखकाचा पत्ता: ३२, शिराळा, सांगली; लेखकाचा मोबाईल नंबर – ९७६५२६२९२६ ]


comments powered by Disqus