शालीमार गार्डन - गायत्री मोर्शीकर

शालीमार गार्डन - गायत्री मोर्शीकर

दिनांक २४ नोव्हेंबर २०११ रोजी हा प्रवास सुरु केला. माझ्या लग्नाला फक्त ९महिने झाले होते. सलग ४ दिवसाची सुट्टी नवऱ्याला होती. त्यामुळे आम्ही व माझ्या नवऱ्याच्या मित्र व त्यांच्या परिवारांनी फिरायला जाण्याचे ठरवले.

आम्ही एका मारूती व्हॅनने प्रवास सुरु केला.

पहिला मुक्काम आम्ही पठाणकोट व जम्मूच्या सीमेवर असलेले पत्नीटाँपला केला. तेथे आम्ही संध्याकाळी पोहचलो. सकाळी उठून आम्ही तेथील सफरचंदच्या बागेत गेलो. नंतर आम्ही सरळ श्रीनगरला डललेकला थांबलो. तेथे जवळ असलेले शालिमार गार्डन पाहिले.

शालिमार गार्डनची माहीती पुढीलप्रमाणे:

ते श्रीनगरमधील मुघल सम्राट जहांगीर यांनी बांधले.त्याचे क्षेत्रफळ १२.४ हेक्टर आहे. ही बाग डललेक जवळ आहे. या बागेत वाहत्या पाण्याचे प्रवाहाचे ४ स्तर आहेत. उन्हाळ्यात व शरद ऋतूत ही बाग सर्वोत्तम मानली जाते. या हंगामात पानाचा रंग बदलतो. अनेक फुले फुलतात. हे उद्यान अनेक बागेचे प्रेरणास्थान मानले जाते. या बागेचा पाणी पुरवठा जवळील हरवन बागेतून येतो. जहांगीरने आपली प्रिय पत्नी मेहरुनिसाकरिता ही बाग बांधली होती. ज्यांना नूरजहाँचे पद देण्यात आले होते. काश्मीर भागात श्रीनगर उष्ण मानले जाते. त्यामुळे या बागेला खूप महत्त्व दिले जाते कारण येथे खूप थंडावा असतो.

पूर्ण झाल्यावर जहांगीर म्हणाले होते की, “पृथ्वीवर कुठेतरी स्वर्ग असल्यास, येथे आहे, येथे आहे, तो येथे आहे.”

खूप छान प्रवास होता. खूप अल्हाददायक वातावरण होते.

अशा प्रकारे आम्ही ४ दिवस पूर्ण काश्मीर पाहिले व आनंदाने घरी परतलो.

[ लेखिकेचा मोबाईल नंबर - ७०४५९४८९६१ ]


comments powered by Disqus