म्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे

म्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे

अगदी बरोबर ओळखलंत मित्रांनो… आज मी तुमच्या साठी म्हैसूर शहरातील व शहराभोवती असणाऱ्या काही पर्यटन स्थळांबद्दल माहिती लिहणार आहे. मी नॅशनल ट्रॅव्हल नी प्रवास केलेले म्हैसूर शहर . मित्रांनो, बंगलोर पासून 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरात जाण्यासाठी जवळ जवळ तीन ते चार तास लागतात.

1) श्रीरंगपटना- म्हैसूर ला जायच्या आधी श्रीरंगपटना हे छोटेसे ऐतिहासिक स्थळ आहे. श्रीरंगपटना हे एक नैसर्गिक द्वीप आहे याच्या दोन्ही बाजूंनी कावेरी नदी वाहते. असे म्हणले जाते की येथे वर्षांपूर्वी टिपू सुलतान नावाचा राजा राज्य करत होता. त्याचा येथे एक किल्ला होता. तो अत्यंत पराक्रमी आणी निर्भीड होता तो इंग्रज सरकारविरुद्ध लढत होता. पण काही लोकांनी त्याच्या विश्वास घात केला आणी किल्ल्याचे गुप्त दरवाजे उघडले . त्यामुळे गुप्त दरवाजा मधून इंग्रज किल्ल्यात घुसले आणी फक्त सहा तासात किल्ला उद्ध्वस्त केला. त्याच्या किल्ल्याचे अवशेष आजही आपल्याला बघायला मिळतात तिथे एक खूप जुने व खूपच सुंदर असे भगवान विष्णु चे मंदिर आहे. या मंदिरात भक्तांची संख्या जास्त असते. काही अंतर कापल्यानंतर म्हैसूर शहरात प्रवेश होतो. काही क्वचित जणांना माहिती असेल की कर्नाटकाची राजधानी म्हैसूर होती पण आता बंगलोर आहे.

2) चर्च- म्हैसूर मधला चर्च खूप छान आहे आणि खूप उंच आहे. येथे खूप वर्षांपूर्वी एक हिंदी चित्रपटाची शूटिंग झाली होती अमर अकबर अँथनी. या चर्च मधील वातावरण अत्यंत शांत आहे.चर्च म्हणाल की क्रिसमस आलाच ना. येथे क्रिसमस हा सण साजरा केला जातो. चर्च पाहून झाल्यावर पुढचा नंबर येतो तो म्हैसूर पॅलेसचा.

3) म्हैसूर पॅलेस - माझ्या मते ताजमहाल नंतर सर्वात जास्त लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे म्हैसूर पॅलेस किंवा आंबा विलास पॅलेस. राजवाड्याची निर्मिती म्हैसूर चे राजा कृष्णराज वडडयर यांनी केली होती. या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण चंदनच्या लाकडापासून केले होते, पण एका दुर्घटनेत राजवाडा जळाला आणी त्यानंतर त्याच जागी भव्य आणि अद्भुत राजवाड्याची निर्मिती करण्यात आली. हा राजवाडा अत्यंत सुंदर आहे तितकाच खूप खूप मोठा आहे. हा राजवाडा इतका मोठा आहे की अक्षरशः डोळे आपोआप विस्फारले जातात. आंबा विलास पॅलेसला तिकीट घेऊन एंट्री करावी लागते. जेव्हा पॅलेस मध्ये प्रवेश कराल तेव्हा तिथे शॉपिंग साठी दुकाने दिसतील या दुकानात प्रवेश करण्यासाठी प्रवेश तिकीट घ्यावे लागते. ही दुकाने वगळून तुम्ही राजवाड्यात प्रवेश करू शकता. राजवाड्यात राजा महाराजांच्या पूर्वजांची अनेक चित्रे आहेत. भिंतीवर म्हैसूर मध्ये दसरा कश्या पद्धतीने साजरा केला जातो किंवा केला जात होता याची चित्रे काढली आहेत. या राजवाड्यात इतर राजवाड्याप्रमाणे दिवाणे खास आणि दिवाणे आम आहे. दिवाणे खास मध्ये बसुन राजे खास प्रश्न सोडवत होते तसेच दिवाणे आम मध्ये राजे जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य करत होते. राजवाड्याच्या आतील भागात सोन्याची अंबारी आहे जवळपास सातशे किंवा आठशे किलो च्या दरम्यान वजन असेल. राजवाड्याची निर्मिती करताना अभियंत्यांनी ईथे त्या काळी एसी लिफ्ट ची निर्मिती केली होती, तेही आपल्याला दिसते. तसेच राजवाड्यात तीन सोन्याची सिंहसने आहेत. या पैकी एक राजा साठी, दुसरे राणी साठी, तर तिसरे हे युवराज (भावी राजा) आहे. म्हैसूर राजवाड्यात दसरा हा सण अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणी जोरात साजरा केला जातो. रात्री असंख्य बल्ब पेटवले जातात त्यामुळे जणु आकाशातील तारे आणी नक्षत्र जमिनीवर आलेत आसे वाटते. म्हैसूरचा दसरा पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. दसरा सणात म्हैसूर शहराला नव्या नवरी सारखे सजवले जाते. अगदी पाय ठेवायला जागा नसते. त्यामुळेच तर पर्यटक हे तीन महिने आधीच रूम बूक करून ठेवतात करण दसरा मध्ये एक साधी रूम ही मिळत नाही. हा राजवाडा बघण्यासाठी जवळ जवळ दोन ते तीन तास लागतात.

4) म्हैसूर प्राणिसंग्रहालय- प्राणिसंग्रहालय म्हणलं की प्राणी पक्षी आलेच. साप, हरीण, हत्ती, मोर, जिराफ, अस्वल, वाघ, सिंह, घोडा याचे साक्षात दर्शन होते. जगात असणारे प्राणी पक्षी यांची संख्या अत्यंत कमी होते आहे. यांच्या संरक्षणासाठी या प्रकारचे प्राणी संग्रहालय असणे महत्त्वाचे आहे.. कारण आज काल काही प्राणी आणी पक्षी फक्त पुस्तकात दिसतात. त्यामुळे येथे जाताना लहान मुलांना सोबत घेऊन जा.

5) ललित महाल - याबद्दल काही पर्यटकांना पुरेशी माहिती नाही हा महाल म्हैसूरच्या महाराजांनी त्यांच्या बहिणीसाठी बांधला होता. आता या महालाचे रूपांतर हॉटेल मध्ये झाले आहे.हा महाल चामुंडि बेटे ला जाताना दिसतो.

6) म्हैसूर शहराचे दर्शन- चामुंडि बेटे ला जाताना एक अशी जागा येते तिथून आपल्याला पूर्ण म्हैसूर शहर एका नजरेत दिसते.

7) चामुंडि हिल्स - चामुंडि बेटे पासून 15 km दूर असलेले चामुंडि हिल्स. येथे चामुंडि देवीचे मंदिर आहे. मंदिरात खूप गर्दी असते. त्यामुळे खास प्रवेश तिकीट घेणे आवश्यक आहे त्याची फी 100 पर हेड अशी आहे मंदिराच्या शिखरावर अत्यंत नाजूक आणी सुंदर चित्रे कोरून काढली आहेत. मंदिरात जाताना जरा सावध राहा कारण येथे माकडाची संख्या जास्त आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ईथे कॅमेरा किंवा मोबाईल मध्ये फोटो घेणे मना आहे. कर्नाटकात या देवीचे खूप भक्त आहेत त्यामुळे या देवीला ताई चामुंडि असे म्हणले जाते. दसरा या सणात या देवीचा खास अलंकार करून सोन्याच्या अंबारी (म्हैसूर पॅलेस) तून मिरवणूक काढली जाते. देवीचे दर्शन झाले कि खरेदी करण्यासाठी दुकाने दिसतील. अगदी स्वस्तात मस्त खरेदी करू शकता

8) वृंदावन गार्डन- भारताचे पहिले अभियंता डॉ. विश्वेश्वरय्या यांनी बांधलेले धरण आणी निर्माण केलेली सुंदर अशी वृंदावन बाग. कावेरी नदीवर बांधलेले धरण भक्कम आहे. त्याभोवती असणारी बाग अप्रतिम आहे. जागो जागी असणाऱ्या पाण्याच्या करंजी ईतके मनमोहक दृश्य की मनाला स्पर्शून जाते. या धरणातून पाणी तमिळनाडू ला जाते. ईथे वॉटर डान्स शो असतो. तो पर्यटकांसाठी आकर्षित असतो. हि बाग ईतकी सुंदर आहे कि त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडतात..

  • लेखिका: अक्षता दिवटे, बंगलोर
    इमेल: adivate484@gmail.com

comments powered by Disqus