फार फार तर काय होईल? – उर्मिला देवेन

फार फार तर काय होईल? – उर्मिला देवेन

फार फार तर काय होईल? कुणाला तरी धक्का बसेल…
कुणी रडेल, कुणी मूक होईल…कुणी सुटकेचा निश्वास टाकेल!!!

कुणी म्हणेल, असं व्हायला नको होत! कुणी बोलेल, जे झालं बरं झालं!
कुणी रागवेल मनातून. कुणी कुरकुरेल, चला. सुटका झाली व्यापातून!!

कुणाचे कसे. कुणाचे कसे! क्षीण होत जाणारे सुस्कारे!
पुन्हां सर्व पूर्वरत…. कदाचित नव्या दमाने.

एवढ्याच फलितासाठी, अंतर्बाह्य इतकं घणघोर युद्ध
जगण्याचं. हो. जगण्याचंच!!!


comments powered by Disqus