अरे संसार संसार - नवनीत सोनार, पुणे

अरे संसार संसार - नवनीत सोनार,  पुणे

navneetsoar@gmail.com 9421974648

अरे संसार संसार, त्याचे जाणूनी घ्या रे सार,
करणे कठीण आहे पार ||

दोन जीवांचा असतो संसार, जोपर्यंत वाढत नाही पसारा,
तोपर्यंत असतो एकमेकांना आसरा ||

एकदा का आला दोघात तिसरा, पत्नी म्हणते माझी सेवा थोडी विसरा
दोघांच्या प्रेमात सुरू होतो घसारा ||

मग हळूहळू सुरू होते शाब्दिक द्वंद्व, क्षणो क्षणी वाटते का यावे असे निर्बंध
निर्बंध वाटतात तिसऱ्या मुळे शिस्तबद्ध ||

संसार जसा फुलतो कळीची होतात फुले, म्हणतात ना मुले म्हणजे देवाघरची फुले
मुलांमुळेच संसार हा खुले ||

त्यांच्या पंखांनी ते जेव्हा उडू लागतात, तेव्हा आनंदाच्या कळ्या फुलू लागतात  
त्यांच्या जाण्याने मन होते विषण्ण, त्याला काही करू शकत नाही आपण  
कठीण संसार असला तरी होतो पार, अरे संसार संसार जाणुनी त्याचे सार  
संसारही एक रांगोळी आहे. नक्षी कोणती ते ठरवायचे आहे  

comments powered by Disqus