चांदोमामा – प्रसन्न पटवर्धन, पुणे

चांदोमामा – प्रसन्न पटवर्धन,  पुणे

pypatwardhan@gmail.com 9960559651

(लेखक मुळचे कोकणातील असून IT क्षेत्रात कार्यरत असतात आणि लिखाण त्यांचा आवडीचा छंद आहे)

कधी ढगांच्या आड, कधी मोकळ्या आकाशी,
चांदोबा, ही लपाछपी तू खेळतोस तरी कुणाशी

वरून तुझ्या शुभ्र प्रकाशात, सर्वांकडे पाहतोस
एवढ्या सगळ्या चांदण्यांच्यात आनंदाने राहतोस

हळू हळू लहान होऊन अजिबातच गायब होतोस
पुन्हा मोठा होता होता गोल प्रकाश होऊन जातोस

कशी करतोस ही जादू, कधी सांगशील का रे आम्हाला
भेटेन का कधी मी, या जादुगार चांदोमामाला


comments powered by Disqus