चारोळ्या: नीला पाटणकर, शिकागो

चारोळ्या:  नीला पाटणकर, शिकागो

१) शिंक्याच सुटलं
अन् बोक्यानं खाल्लं
मांजरीनं पाहीलं
नी बोक्याला बदड,बदड बदडलं

२) एकच मंत्र गिरवा
शब्दकोडी सोडवा
नैराश्य घालवा
विस्मृती पळवा

३) आई मुलाचे प्रेम वेगळे
प्रेमाचे हे बंध निराळे
विश्वासाचे नाते आगळे
फुलुन जाती जगावेगळे

४) चंदामामा ढगा आडूनी,लपाछपी खेळतो
पाहुनी मला तो,गोड स्मित हास्य करतो
मोहक तो चेहरा,संध्याछायेत चमकतो
छान गोंडस,सुंदर तो बालकांना आवडतो.

५) बकुळ फुलांनी भरली
माझी ओंजळ
फुला फुलांत भरली,
सख्याच्या प्रीतीची धुंद दरवळ

६) काव्य गंधातील होळी
धुळवडीच्या रंगात लोळी
करी मने सारी मोकळी
ओठी येती कवितेच्या ओळी


comments powered by Disqus