सून माझी लाडाची – नीला पाटणकर

सून माझी लाडाची – नीला पाटणकर

सून माझी लाडाची,ग बाई लाडाची
कधी न मला दुखवायची,
बाई दुखवायची. ॥१॥

सून माझी प्रेमाची,ग बाई प्रेमाची
कधी न मला बोलायची,
बाई बोलायची ॥२॥

सून माझी कष्टाची,ग बाई कष्टाची
कधी न मला काम सांगायची,
बाई सांगायची ॥३॥

सून माझी सुगरण,ग बाई सुगरण,
कधी मला पंचपक्वान्न खिलवायची,
बाई खिलवायची ॥४॥

सून माझी गोडाची,ग बाई गोडाची
नेहमी माझी स्तुती गायची,
बाई गायची. ॥५॥

सून माझी हौसीची,ग बाई हौसीची,
कधी ही माझी हौस पुरवायची,
बाई पुरवायची ॥६॥

सून माझी शिस्तीची,ग बाई शिस्तीची,
रोज माझे शिस्तीचे धडे गिरवायची,
बाई गिरवायची ॥७॥

सून माझी वळणाची,ग बाई वळणाची,
नेमेची मला वळण लावायची,
बाई लावायची. ॥८॥

सून माझी कित्ती छान,ग बाई छानच,
सदा मला आवडायची.
बाई आवडायची. ॥९॥

सून माझ्या प्रितीची,ग बाई प्रितीची,
कधी ना माझी व्हायची नावडती,
बाई नावडती. ॥१०॥


comments powered by Disqus