लॉकडाऊन २.० - लेखन स्पर्धा

लॉकडाऊन २.० - लेखन स्पर्धा

आरंभ , bookstruck.app आणि अर्थ मराठी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगात जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि बहुतांश लोकांना घरातंच आपला वेळ खर्च करावा लागत आहे. ह्याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम येत्या दिवसांत आम्हाला दिसू लागतीलच पण त्याच वेळी ह्या वेळेंत लोकांचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा काही अंशी बदलला असेल.

हा आपला दृष्टिकोन तसेच ह्या वेळेंत आपण आपल्या अंतरंगात डोकावून काही नवीन विचार केला असेल तर ते विचार इतर लोकांपुढे मांडावेत ह्या दृष्टीने आम्ही हि लेखन स्पर्धा घेत आहोत.

टीम आरंभ १००% स्वयंसेवकांनी चालवलेली आहे. आपले लिखाण हाच आमचा मोबदला आहे आणि आधुनिक प्रकारचे साहित्य जगभर पसरलेल्या मराठी रसिकांच्या समोर आणणे हेच आमचे ध्येय आहे.

आपण ह्या स्पर्धेंत सहभागी होऊ इच्छिता तर कृपया आपले साहित्य खालील पत्त्यावर पाठवावे. त्याशिवाय हा संदेश इतर लेखकांकडे पाठवावा.

Instructions for writing competition

comments powered by Disqus