ओझे पुनर्जन्माचे
सविता गणेश जाधव
कृष्णाई रेसिडेन्सी फ्लॅट नंबर एस/२, १३२ व्यंकटपुरा पेठ, सातारा
मोबाईल ९४२३८६७३२९
दरवाजाची बेल वाजली. शेजारच्या काकू नेहमीप्रमाणे चेहरा पाडून दारात उभ्या होत्या. दुःखी भावनांनी भरलेला तो रडवेला चेहरा मला अगदी पाठ झाला होता. नेहमीप्रमाणे त्यांना पुन्हा एकदा रितं व्हायचं होतं. त्यांना बसायला सांगून सगळ्या घर कामांना स्वल्पविराम दिला आणि त्यांच्या पुढ्यात येऊन बसले. त्यांच्या डोळ्यात अश्रुंचे ढग दाटून आले होते खांद्यावर हात ठेवायचा अवकाश ओघळू लागले का कुणी हुंदके बोलायला सुरुवात केली जे की मला अगदी पाठ झालं होतं, पण माझं कविमन मला समजावत होतं की दुःखी भावनांना व्यक्त होण्यासाठी गरज असते… एका विश्वासू खांद्याची… काही क्षणांसाठी हेच पुन्हा एकदा पंख पसरत काही क्षणांसाठी, मग हेच वित्त मन पुन्हा एकदा पंख पसरत… नव्या उमेदीने जगण्यासाठी….!
काकू बोलत होत्या, “आधी आमची परिस्थिती जेमतेम होती पण जसा पैसा यांच्या हातात खेळायला लागला तसं यांना मुंग्याच जणू… दिवस न रात्र… नुसती पैशांची उधळण चैनी… आणि अशा मुळे आम्ही कर्जबाजारी झालो होतं नव्हतं ते विकावं लागलं आता या वयात पुन्हा सगळं नव्यानं… दोन मुली पदरात… एकटी तर अगदी लग्नाच्या उंबरठ्यावर कसं करू काय करू काही सुचत नाही ग ! तरी मी यांना सांगत होते…” काकूंना हुंदका अनावर झाला होता… तरीसुद्धा रडत रडत का कुणी काकांच्या राहून गेलेल्या सगळ्यांची उजळणी केली…
आता माझा रोल चालू होणार होता… नेहमीसारखा समजुतीचा… सकारात्मक दृष्टिकोनाचा… माझी भूमिका ठाम होती… सरांचा खांदेकरी होण्यापेक्षा जगण्याचा खांदेकरी एक जगणं आणखी सुंदर होईल
काकू मोकळ्या मनानं निरभ्र आकाश घेऊन घरी गेल्या आणि मी घड्याळाकडे नजर टाकून पुढची कामे वेळेत उरकण्यासाठी कामाचा वेग वाढवला
कुलकर्णी गुरुजींकडून घेतलेली वेळ धावत पळत का होईना आज गाठायची होती मोठ्या मुलाची पत्रिका आज काही करुन दाखवायचीच असे मी मनोमन ठरवलं होतं गुरुजींच्या कार्यालयात पोचल्यावर मी हुश्श! असा सुस्कारा टाकून खुर्चीवर टेकले इतक्यात केबिन मधून पन्नास ची एक व्यक्ती बाहेर आली त्यांचे डोळे रडून रडून सुजलेले जाणवत होते दुःखी, कष्टी, व्याकूळ जणू या सगळ्या भावनांनी त्या उदास चेहऱ्यावर गर्दी केली होती.
मी केबिनचे दार उघडून, “आत येऊ का ?” असं विचारलं तेव्हा गुरुजींचा चेहरा त्या व्यक्तीपेक्षा अगतिक, उदास, अपराधी वाटला. मी काही बोलणार इतक्यात गुरुजीच बोलू लागले, “मला कळत नाही लोक आयुष्य खोटेपणा नका जगतात अगदी मरेपर्यंतच नव्हे तर मेल्यावर सुद्धा !” मी गडबडले गुरुजी बोलत होते, “या गृहस्थाची पत्नी पंधरा दिवसांपूर्वी वारली गेली कित्येक वर्ष ती माझ्याकडे यायची या गृहस्थाची तक्रार घेऊन मी तिला उपासना सांगायचो समजूत काढायचो ती इथून जाताना मोकळ्या मनानं जायची आज हा गृहस्थ भेटायला आला मला त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच पश्चातापाचे अपराधीपणाचे भाऊ दिसले नाहीत म्हणून मी त्याला त्यांच्या वागण्याचा जाब विचारला तसा तो ढसाढसा रडला आणि म्हणाला, “गुरुजी माझी बायको आता नाही मेल्यानंतर गेलेल्या व्यक्ती बद्दल वाईट बोलू नये असं म्हणतात पण देवा शप्पथ सांगतो मी कधीच अशा तिच्याशी वागलो नाही तिच्या नजरेत मी इतका वाईट होतो हे मला आता समजले गुरुजी ती अशी का वागली मला माहीत नाही पण मी आज पूर्णपणे हरलो गुरुजी” हे आरोप जर खोटे काल्पनिक असतील तर त्या व्यक्तीच्या कोसळण्याला मी स्वतःला जबाबदार समजतोय त्याच वेळी दुसरी बाजू यायला हवी होती असं मला वाटतय “
हे सगळं ऐकून मी खूपच अस्वस्थ झाले आणि गुरुजींना सहजच विचारलं, “आता पुढे काय ?” गुरुजी त्यांच्या धीर गंभीर आवाजात, म्हणाले, “हे आरोप काल्पनिक असतील चढवून… वाढवून… सहानुभूती मिळवण्यासाठी केले असतील तर निसर्गात पेरलेले न भोगलेले भोगण्यासाठी त्या व्यक्तीला पुनर्जन्म घ्यावा लागेल.”
अचानक शेजारच्या काकूंचा चेहरा डोळ्यापुढे का आला समजलेच नाही मी तडक उठून उभी राहिली गुरुजींच्या प्रश्नार्थक चेहर्
याकडे न बघताच, “नंतर येते” असं घाईतच बोलून मी आधी काकूंचं घर गाठलं मला बघून गोंधळल्या पण या क्षणी मला रित तर व्हायचं होतं मु कळवायचं होतं मी काकूंना सगळी घटना सविस्तर सांगितली जाणवत होतं की काकू नजर चुकवत होत्या… पण मी दुर्लक्ष केलं आणि मी मोकळी झाली.
मंडळी, आज तीन महिने झाले का कुणी दरवाजाची बेल वाजवली नाही जिना उतरताना काकांचा गाण्याचा आवाज कानावर पडला एका पुनर्जन्माची दुःखी भोग चालू आपल्यामुळेच थांबले असं वाटून मी मनोमन हसले आणि काकांचं गाणं गुणगुणू लागले….. “हे जीवन सुंदर आहे…”