आरंभ साठी लिहा

आरंभ मध्ये लिहिण्यासाठी आधी खालील बंधने पाळावी.

  • लेख आणि साहित्य आपले स्वतःचे असणे आवश्यक आहे. वाग्मयचौर्याला आम्ही अजिबात थारा देत नाही.
  • आरंभ ला आपण कुठल्याही प्रकारचे लेख आणि व्यंग चित्रे पाठवू शकता. संपादक मंडळ ते प्रकाशित करावे कि नाही ह्याचा निर्णय घेतील.
  • आरंभ ला आपण एकदा आपले साहित्य पाठवले ह्याचा अर्थ ते साहित्य प्रकाशित करण्याचा प्रतःधिकार आरंभ कडे सुरक्षित राहील.
  • आपण आपले साहित्य खालील पत्त्यावर पाठवू शकता. आपले नाव आणि पत्ता बरोबर देण्यास विसरू नये. तुम्हाला टोपण नाव वापरायचे असेल तर तसे स्पष्टपणे लिहावे.
  • पत्ता : aarambhmasik@gmail.com
  • आरंभ विषयी इतर माहिती आणि इतर लेखक वाचकांची संपर्क करण्यासाठी कृपया आमचा फेसबुक पेज Like करावा.

आरंभसाठी लेख पाठवतांना लेखकांसाठी मार्गदर्शक सूचना:

सर्वात महत्वाचे म्हणजे: लेख युनिकोड मराठीतून टाईप केलेलाच असला पाहिजे. कागदावर पेनाने लिहून त्याचा फोटो असलेला लेख स्वीकारला जाणार नाही.

युनिकोड मराठी म्हणजे कोणते? मोबाईलवर आपण चॅट करतांना मराठी कीबोर्ड मधून जे मराठी लिहितो तेच युनिकोड मराठी! म्हणजे दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर फोनेटिक मराठी, अर्थात आपण प्रत्येक मराठी शब्द इंग्लिशमध्ये टाईप करतो आणि तो मराठीत उमटतो तसे! उदाहरणार्थ: टाईप taaip, चला chalaa, कुठे kuthe, जीमेल jimel, टायपिंग tayaping, माझ्याप्रमाणे mazyapramaane, एप्लिकेशन eplikeshan

कोणते मराठी कीबोर्ड युनिकोड टायपिंग सपोर्ट करतात? गुगल इंडिक कीबोर्ड (Google Indic Keyboard) आणि जीबोर्ड (gboard). यापैकी gboard हा कीबोर्ड मराठीत voice typing पण सपोर्ट करतो. कीबोर्ड च्या माईक वर क्लिक करून मराठी बोला, आपोआप मराठी टाईप होईल.

कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉपवर लिहित असाल तर docs.google.com वर जाऊन तिथे वरीलप्रमाणेच युनिकोड मध्ये मराठी लिहू शकता. येथूनही मराठी voice typing होते.

लेख कुठे लिहायचा आणि कसा पाठवायचा? कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉप वर लिहित असाल तर लेख आधी “नोटपॅड” मध्ये लिहा त्यामुळे अनावश्यक formatting नष्ट होते. तिथून मग तुमच्या जीमेलवर टाका आणि आरंभला पाठवा: aarambhmasik@gmail.com मोबाईलवर लिहित असाल तर लेख आधी “गुगल कीप” या एप्लिकेशन मध्ये लेख लिहा त्यामुळे अनावश्यक formatting नष्ट होते. तिथून मग तुमच्या जीमेल वर टाका आणि आरंभ ला पाठवा.

शुद्धलेखनाबद्दल:

शुद्धलेखनाच्या चुका नसाव्यात. लेखात नगण्य म्हणजे जर फक्त ५ टक्के शुद्धलेखनाच्या चुका असतील तरच त्या आरंभ टीम दुरुस्त करेल. त्यापलीकडे जास्त चुका असल्यास लेख स्वीकारला जाणार नाही आणि त्या लेखकाला तशी सुचना पाठवून पुन्हा तो लेख दिलेल्या मुदतीत दुरुस्त करून पाठवावा लागेल. नाहीतर लेख स्वीकारला जाणार नाही.

  • ✅ दोन शब्दांमध्ये एक स्पेस हवीच.
  • ✅ वाक्य पूर्ण झाल्यानंतर एकही स्पेस न देता पूर्ण विराम हवा आणि त्यानंतर एक स्पेस सोडून मग पुढचे वाक्य सुरू करावे.
  • ✅ वाक्य संपल्यानंतर स्पेस न देता पूर्णविराम द्यावा.
  • ✅ उद्गारार्थी चिन्हानंतर स्पेस न देता वाक्य सुरु करावे
  • ✅ स्वल्पविरामानंतर एक स्पेस देऊन मग पुढचा शब्द लिहावा.
  • ✅ शक्यतो इंग्रजी शब्दांचा वापर कमीत कमी असावा. पर्यायी मराठी शब्द वापरावा. नसलाच तर इंग्रजी शब्द मराठीत उच्चार करुन लिहा. प्रॉब्लेम्स, डायरेक्ट, फॉरेनर्स वगैरे.
  • ✅ अनुस्वार, काना, मात्रा, वेलांटी, उकार वगैरे सगळे नीट चेक करा आणि दुरुस्त करा.

उदाहरणार्थ:

  • “तो म्हणाला कि” हे अशुद्ध आहे, “की” ला दुसरी वेलांटी हवी.
  • “अजुन” हे अशुद्ध “अजून” जे शुद्ध आहे,
  • “आणी” हे अशुद्ध आहे “आणि” हे शुद्ध आहे याप्रमाणे.
comments powered by Disqus