कविता: गरिबीतील जीवन - सुवर्णा कांबळे

कविता: गरिबीतील जीवन - सुवर्णा कांबळे

संसाराचा गाडा ओढताना, मेटाकुटीला यावं लागतंय
रोजचं कष्ट करून सुद्धा, अर्धपोटी राहावं लागतंय

जीवनातील गरजेसाठी, राब राब राबाव लागतंय
गरिबीचा वणवा पाहून, आम्हा पोट जाळाव लागतंय

संकटाला तोंड देता-देत, होरपळून जावं लागतंय
दुःखाचे वेदना सोसताना, आसवात भिजावं लागतंय

पोराबळाच्या शिक्षणा साठी, सावकार शोधावा लागतोय
कर्ज परत करण्यासाठी, पार खचून जावं लागतंय

भावनेचा निचरा होताना, रडतच राहावं लागतंय
रडत असताना देखील, हसतच जगावं लागतंय

या गरिबीतील जीवनात, रखडत बसावं लागतंय
कोणीतरी एकच दिवस, गरिबीला पाहावं लागतंय

जीवनातील घडामोडीना, मनात साठवाव लागतंय
ते मन मोकळे करताना, कागद , पेन लागतंय

लेखिका: सुवर्णा कांबळे
पत्ता: साई ओंकार सोसायटी, सेक्टर- 12, रुम नं- 25, कळंबोली
मोबाईल: 9960354673
ईमेल: Suvarnakamble474@gmail.com