कविता: पोरी पदर तुझा सावर - सुवर्णा कांबळे

कविता: पोरी पदर तुझा सावर - सुवर्णा कांबळे

पोरी पदर पदर तुझा सावर गं सावर! आलीस यौवनांच्या उंबरठ्यावर!

खळी तुझ्या गालावर, स्मित तुझ्या ओठावर,
दृष्ट लागेल रूपावर, पोरी पदर तुझा सावर ग सावर!
तोल तुझा आवर ग आवर ! जाशील वळणाच्या वाटेवर,
मऊ होईल तो रुळल्यावर, पोरी पदर तुझा सावर ग सावर!

नजर फिरव या जगावर! मायाजाल फसवेगिरी वर ,
जगू नको फसव्या आशेवर, पोरी पदर तुझा सावर ग सावर!

विश्वास ठेव ग मनावर! प्रेम कर तू जगण्यावर,
नौका येते ती किनाऱ्यावर, पोरी पदर तुझा सावर ग सावर!

लेखिका: सुवर्णा कांबळे


comments powered by Disqus