जनांचा प्रवाहो चालीला - हेमंत बेटावदकर, जळगांव
9403570268
गेल्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा सुरू आहे. गावागावातूनवारकऱ्यांच्या दिंड्या विठूनामाचा जयघोष करत हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका घेवून पायी मजल दरमजलकरित विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने जात आहेत.
“सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनीया” तुकोबारायानीवर्णन केलेले विठ्याचे ते सावळे पितांबर नेसलेले रुप पहाण्यासाठी भेटीलागी जीवा लागलीसे आस असे भाव मनात ठेवून जनांचा हा प्रवाहचालतो आहे.
चला पंढरीसी जाऊ रखुमादेवीवरा पाहू॥ डोळे निवतील काना मना तेथे समाधान।।
समस्त वारकरी या एकाच ध्येयाने प्रेरित होवून पावसा पाण्याची, उन्हा तान्हाची, कापड्या लत्त्याची इतकेच काय पण तहानभूकेचीही पर्वा न करता है शेकडो मैलाचे अंतर पायी पायी कापत आहेत.
“रूपे संदर सावळा गे माये” अशा त्या विठूरायाच्या पायाशी जाऊन पडण्याची काय ही ओढ? चंद्रभागेत स्नान करावे, वाळवंटात रंगणाऱ्या भजन किर्तनाचा आस्वाद घ्यावा, पुंडलीकाच्या पायरीवर माथा टेकवावा आणि शतजन्माचे पुण्य पदरी पाडून घ्यावे.
“तुका म्हणे डोळा। विठो बैसला सावळा।।” असे तुकोबाच्या नेत्रांनीच त्याचे रुप डोळ्यात साठवावे आणि अश्रुंना मोकळी वाट करुन देत माघारी परतावे.
या वारीला जातांना सगळ्यांच्या मनात एकच भावना असते. सुखलागी जरी करिसी तळमळ। तरीत्पैदरीशीजाय एकवेळ॥ मग तूअवघाचि सुखरुप होसी। जन्मोजन्मीचे दुःख विसरशी।।
वाटेवर इतर दिंड्या येवून मिळतात, भक्तीचा महापूर येतो टाळ आणि मृदंगच्या सोबतीने कधी चालत, कधी नाचत, कधी फेर धरत, तर कधी रिंगण करत हा महासागर जेंव्हा विठ्ठल मंदिशचे कळसदर्शन होते तेव्हा बेभान होतो आणि त्याच्यापाशी एकच मागणे आर्ततेने मागतो. विठुराया रे, पाहू नको अंत। बोलावी मज सत्वरी आता।।