अरे संसार संसार - नवनीत सोनार, पुणे
navneetsoar@gmail.com 9421974648
अरे संसार संसार, त्याचे जाणूनी घ्या रे सार,
करणे कठीण आहे पार ||
दोन जीवांचा असतो संसार, जोपर्यंत वाढत नाही पसारा,
तोपर्यंत असतो एकमेकांना आसरा ||
एकदा का आला दोघात तिसरा, पत्नी म्हणते माझी सेवा थोडी विसरा
दोघांच्या प्रेमात सुरू होतो घसारा ||
मग हळूहळू सुरू होते शाब्दिक द्वंद्व, क्षणो क्षणी वाटते का यावे असे निर्बंध
निर्बंध वाटतात तिसऱ्या मुळे शिस्तबद्ध ||
संसार जसा फुलतो कळीची होतात फुले, म्हणतात ना मुले म्हणजे देवाघरची फुले
मुलांमुळेच संसार हा खुले ||
त्यांच्या पंखांनी ते जेव्हा उडू लागतात, तेव्हा आनंदाच्या कळ्या फुलू लागतात | |
त्यांच्या जाण्याने मन होते विषण्ण, त्याला काही करू शकत नाही आपण | |
कठीण संसार असला तरी होतो पार, अरे संसार संसार जाणुनी त्याचे सार | |
संसारही एक रांगोळी आहे. नक्षी कोणती ते ठरवायचे आहे |