संपादकीय

संपादकीय

नमस्कार वाचक मंडळी!

आरंभचा 2019 या वर्षाचा शेवटचा म्हणजे सुरुवातीपासूनचा एकूण 13 वा अंक आपल्या हाती (अर्थातच डिजिटल स्वरूपात) देतांना आरंभ टीमला आनंद होत आहे!

आरंभ हे मासिक म्हणून 2018 झाली सुरू झाले आणि पाहता पाहता त्याचे त्रेमासिक होऊन त्याला दोन वर्षे पूर्ण सुद्धा झाली. या दोन वर्षात आरंभला भरपूर लोकप्रियता लाभली, तसेच अनेक प्रतिथयश आणि नवनवीन लेखक आरंभ सोबत जोडले गेले. भारतातच नाही तर परदेशातील मराठी वाचकांकडून सुद्धा आरंभवर कौतुकाची थाप पडली याचा मला आनंद वाटतो.

त्यात भर म्हणून मागील महिन्यात ईशा फाउंडेशन कडून मला फोन आला आणि त्यांचे लेख त्यांनी मला आपल्या आरंभ मासिकात नियमितपणे देण्याची इच्छा व्यक्त केली आणि अर्थातच ती मान्य केली. याहून मोठी लोकप्रियतेची पावती अजून कोणती? याचा अर्थ आरंभ टीमची जबाबदारी आणखी वाढली आहे. मराठी भाषेच्या सेवेसाठी आरंभ टीम मध्ये कुणाला काम करायचे असल्यास त्यांनी आरंभच्या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.

या डिसेंबर अंकासाठी मी लेखकांना विनोदी लिखाण करण्यासाठी आवाहन केले होते आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या अंकात आपल्याला नेहमीच्या सदरांसोबतच विनोदी लेख आणि कथा वाचायला मिळतील. हा अंक कसा वाटला हे लेखकांना आणि आरंभ टीमच्या ईमेल आयडीवर कळवण्यास विसरू नका.

तरुण विचारांच्या या त्रैमासिकवर असेच भरभरून प्रेम करत राहा! लिहिते व्हा आणि लिखाणातून वैचारिक बदल घडवा!

  • निमिष सोनार, संपादक, आरंभ त्रैमासिक
    (आरंभ: एका नव्या साहित्य युगाचा!)

comments powered by Disqus