अध्यात्म: कर्मयोगातून साक्षात्कार गाठता येणे शक्य आहे काय? - सद्गुरू (ईशा फौंडेशन)
(आपण जी कर्मे करतो त्यातून आपले आयुष्य कसे घडवायचे, हे सांगताना सद्गुरू म्हणतात, ज्यावर तुमची नितांत निष्ठा आहे तेच करा)
प्रश्न : नमस्कार सद्गुरू; आपल्या ध्येयकार्याचा आणि दूरदृष्टीचा एक भाग होण्याची माझी इच्छा आहे, आणि तुम्ही म्हणता तसं एक ‘साक्षात्कारी जीवन’ जगावे. आणि मग सगळीकडे सुख-समाधान असावे असे मला वाटते. पण कुठेतरी, माझ्या आत मला एक प्रकारची भीती वाटते, की हा मार्ग मी शेवटपर्यंत चालू शकेल की नाही. हेच मला पुढं जाण्यापासून रोखतंय. तर या भीतीवर मी मात कशी करू?
सद्गुरू : मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की जेव्हा सगळं जग आनंदी करण्याचे आपले ध्येय आहे तेव्हा आपण कोणीच शेवटपर्यंत टिकणार नाही आहोत. त्यामुळे अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची चिंता करू नका. तुम्हाला असं वाटतं का की उद्या सारे जग एकदम आनंदी होईल? वयाच्या 25 व्या वर्षी, जेव्हा मी पहिल्यांदा परमानंदात भिजून गेलो होतो तेव्हा मला खरोखर वाटलं की मी संपूर्ण जगाला आनंदी बनवू शकतो आणि प्रत्येकजण स्वत:च्या कल्याणासाठी काहीतरी करायला तयार असेल. हे तीन दशकांपूर्वीचे होते. आता आज मला माहीत आहे की असे बरेच जण आहेत जे स्वत:चाच विध्वंस करवून घेणारे आहेत. आम्ही लाखो लोकांना स्पर्श केला आहे, पण तरीही हे संपूर्ण जग नाही.
‘ज्यावर तुमची नितांत निष्ठा आहे तेच करा’
आणि तुम्ही कधीच मला ज्याची काळजी आहे ते करू नका. तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी बद्दल खरंच आस्था वाटते, ते केलं पाहिचे. तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल आस्था आहे ते तुम्ही केलं नाही तर तुम्ही चांगले जगलात की नाही पाहायला आयुष्याच्या शेवटपर्यंत थांबण्याची गरज नाही - ते आधीच वाया गेलेले जीवन आहे. तुम्हाला हे काम महत्वाचे वाटत असेल तर तुम्ही ते केले पाहिजे.
वास्तविक, मी ज्या प्रकारे बनलेलो आहे, जर मी माझे डोळे बंद केले तर कदाचित मी कधीच उघडणार नाही. माझे कार्य केवळ जगाच्या गरजेनुसार आहे. अन्यथा, मी एकटा असतो तेव्हा मी सर्वोत्तम स्थितीत असतो. मग मला लोकांसमवेत राहण्याची का का गरज वाटेल ? मला काहीतरी करायची का इच्छा होईल ? पण जगात बरेच काही करण्याची गरज आहे, म्हणून मी दिवसातले वीस तास काम करत आहोत. जेव्हा मी सकाळी उठतो, एखादी व्यक्ती तिथे वाटच पाहत असते ज्याच्याकडे मला लक्ष द्यावे लागणार असते.
ही सर्व कृती मला गरज आहे म्हणून नाहीये. जर तूम्ही मला एकट्याला सोडले तर कोणत्याही कृतीशिवाय मी एकदम ठीक आहे. मला एकही शब्द म्हणायचा किंवा लिहायचा नाही. मला काहीही करण्याची गरज नाही. पण आणखी बरेच काही करणे बाकी आहे, म्हणून ही सगळी कृती आवश्यक आहे. तुमची कृती ही कधीही स्वतःबद्दल असू नये. तुम्ही स्वतःच्या आत कसे आहात हे तुमच्या बद्दल आहे. पण तुमची कृती असावी हे असलेल्या सद्यपरिस्थितीशी निगडीत असावे. दुर्दैवाने, बहुतेक लोकांची कार्ये स्वतःबद्दलच असतात. ते जगात कार्य करतात कारण त्यांना स्वतःहून काहीतरी बनवायचे आहे, जो चुकीचा दृष्टीकोन आहे. बहुतेक मानसिक आजार या मूलभूत त्रुटीमुळे उद्भवतात, की लोक कुणीतरी होण्यासाठी काहीतरी करत आहेत. प्रथम तुमच्या आतलं अस्तित्व निश्चित करा – मग कृती करा. तुम्ही असं केलं, तर मग त्यातून जे घडून यायचं ते घडून येईल.
तुम्हाला जर या कार्याचे मूल्य दिसत असेल, हे घडून आलेच पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते करणे आवश्यक आहे. कसे आणि कोणत्या स्तरावर, ते तुमच्यावर अवलंबून आहे. प्रत्येकजण बदल घडवून आणण्यासाठी स्वतःच्या मनाच्या गोष्टी करत असेल तर ते केवळ त्यांच्या समाधानासाठीच असेल. आपल्याला खरोखर बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला एकत्र येऊन हे करावं लागेल. हे कार्य स्वत:ला समाधानी करण्याबद्दल नाही. आपण समाधानी झालो, म्हणून आपण कार्य करतो. तुम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे म्हणून नव्हे. जर ते करणे आवश्यक असेल तर प्रत्येक जवाबदार व्यक्तीने उभे राहिले पाहिजे. आपण घेत असलेले हे काही एक प्रकारचे अभियान नाही. ही तुमच्या मानवतेची अभिव्यक्ती आहे. आणि या प्रकारच्या कृतीचे विशेष म्हणजे ती तुम्हाला माणूस म्हणून अगदी सुंदररित्या घडवते.