कविता: आभार मानले मी - नीला पाटणकर, शिकागो

कविता: आभार मानले मी - नीला पाटणकर, शिकागो

फोन: +1(847) 8403286

राहील्यावर जीवंत,जनाचे आभार मानले मी
राहुं दिले मला हे,तयांचे,रूण मानले मी ॥१॥

तेव्हां जरी थोडासा,हताश झालो होतो मी
सारेच हातचे,गेल्यावर निराश होतो मी ॥२॥

होते पाठी मोडक्या घराचे,बीळ चिंतेचे
परक्या पीडांना,आपलेच मानले मी. ॥३॥

जीवन जगतांना,इतुकाच खेद होतो
कांही संधीसाधुंना उदार मानले मी ॥४॥

प्रत्येक सोबत्यांच्या,वावरात राबतो मी
प्रत्येक तोतयाला,सोज्वळ मानले मी ॥५॥

जे खोल वार सोसले,ते माझेच मानले मी
माझ्याच पराजयाची,आहुती दिली मी. ॥६॥

दि.९ जुलै२०१९.
© नीला पाटणकर
(आत्महत्ये पासून परावृत्त केलेल्या शेतकऱ्याच्या मनांतील विचार मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न होता)


comments powered by Disqus