गझल: तू - प्रकाश क्षीरसागर
मजला कधीच मित्रा खड्ड्यात घातले तू ,
आणि भले बुरे ते बोलून घेतले तू ||
अवचीत भेटता तू , हसलास ओळखीचे ,
मन मोहरून जाता कोड्यात पाहिले तू ।।
चाळीत राहणारे दुःखात धीर देती ,
अन् मित्र म्हणवणारा प्रेमात टाळले तू ||
आत्म्यास मोह नसतो इच्छात वासनेच्या ,
जवळ नसून सुद्धा देहास चाळले तू ||
रात्री जरी प्रियेला छेडून स्वप्न जाते,
प्रेमातल्या क्षणांना सागर
वाटले तू||
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
अर्नेस्टिना, थोरले भाट, ताळगाव, गोवा