भाव अंतरीचा – छाया पवार

भाव अंतरीचा – छाया पवार

भाव तुझ्या अंतरीचा
कधी जाणला नाही
नजरेतले कारुण्य तुझ्या
कधी उमगलंच नाही II

मनात दडवलेले शब्द
ओठावर आलेच नाही
समोरच्याला जाणण्याचा प्रयत्न
कधी केलाच नाही II

हृदयातील स्पंदने तुझ्या
मनाला सांगू पहातात
मनातल्या गाभार्‍यातले शब्द
आज मुक्त होवू इच्छितात II


comments powered by Disqus