स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर

स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर

फुला माझ्या स्वप्नीच्या,
उमलू नकोस सत्यात,
तुझ्या उमलण्याकडे सर्व,
ठेवून आहेत लक्ष।।

कधी मारतील डंख,
कधी घालतील घाव,
सोसणार नाही तुला,
आता अधिक दुःख।।

म्हणूनच माझ्या फुला,
उमलू नकोस आता,
वारा गातो गाणी,
पक्षांची मंजूळ वाणी।।

फसवी आहेत बाळा,
उमलू नकोस फुला।।