जनता कर्फ्यू
पंतप्रधान मोदीनी २२ मार्च ला जनता कर्फ्यू ची घोषणा केली आहे आणि जनतेकडून सहकार्याची मागणी केली आहे. कोरोना वायरस ने जगांत धुमाकूळ घातला आहे. इटली आणि चीन मध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि सर्व जगांत लक्षावधी लोक संक्रमित झाले आहेत.
हा रोग संसर्ग जन्य असल्याने हा रोग व्हाट्सअँप मेसेजेस प्रमाणे वायरल होतो आणि हा हा म्हणता लक्षावधी लोक संक्रमित होतात. ह्या रोगाला रोखण्यासाठी संसर्ग रोखणे आवश्यक आहे. किमान २४ तास आम्ही सर्व लोकांनी सयंम दाखवून सर्व प्रकारचा संपर्क टाळला तर रोगाचे संक्रमण थोडे तरी कमी होईल. कोरोनाचे व्हायरस २४ तास पेक्षा जास्त वेळ शरीरा बाहेर जगू शकत नाहीत. २४ तासांत जर आम्ही सर्व घराच्या बाहेर पडलोच नाही तर किमान बाहेर असलेले जंतू मारून जातील.
ह्या शिवाय कर्फ्यू जर जास्त दिवस चालू ठेवायचा असेल तर नक्की काय स्टेप्स सरकारला घ्याव्या लागतील ह्याचा एक डेमो सुद्धा ह्यामुळे आम्हाला पाहायला मिळेल.
कोरोना वायर्स अत्यंत धोकादायक असून इथे कुठल्याही प्रकारचा आळशीपणा दाखवणे म्हणजे मूर्खपणा आहे. सर्व जगांत सर्व लोकांनी भेदभाव विसरून एकजूट होऊन हा लढा उभारणे आवश्यक आहे.
- संपूर्ण रविवारी घराच्या बाहेर अजिबात पडू नये.
- उगाच खरेदी करू नये, भारतात अन्नधान्याचा साठा सध्या विपुल आहे.
- आपले हाथ वारंवार धुवावेत. घरातील परिसराची सफाई करावी.
- अफवा पसरवू नयेत.
- गरज नसेल तर विनाकारण हॉस्पिटल मध्ये जाऊ नये.
कर्फ्यू सकाळी ९ वाजता सुरु होईल आणि संध्याकाळी ५ वाजता बंद होईल. पण शक्य असेल तर आपण सोमवारीच घराच्या बाहेर पाय ठेवावा.