आरंभ त्रैमासिकाचा आगामी जून २०२० अंक हा कथा विशेषांक

आरंभ त्रैमासिकाचा आगामी जून २०२० अंक हा कथा विशेषांक

लेखक मंडळी, आरंभ त्रैमासिकाचा आगामी जून २०२० अंक हा कथा विशेषांक असणार आहे. त्यासाठी आतापासून तयारीला लागा! कथेला शब्दमर्यादेचे बंधन नाही पण म्हणून कथेची कादंबरी होऊ देऊ नका! कथा खाली दिलेल्या प्रकारांपैकी आणि स्वत: लिहिलेली असावी. एक लेखक जास्तीत जास्त दोन कथा पाठवू शकतो. लेखन शुद्ध असावे आणि व्याकरणाच्या चुका नसाव्यात. कथा सत्यकथेवर आधारित असली तर चालेल पण मूळ व्यक्तींची आणि ठिकाणांची नावे बदलावीत.

कथा टाईप करून १५ मे पर्यंत आरंभच्या ईमेल आयडी वर: aarambhmasik@gmail.com पाठवा! खालील विषय फक्त तुम्हाला मार्गदर्शन म्हणून दिले आहेत, काही वेळेस एकच कथा ही अनेक प्रकारांत मोडू शकते!

तर मग कसला विचार करताय? तुमच्या कल्पनाशक्तीचा घोडा स्वैर सोडा, लेखणीची (कीबोर्ड) तलवार आणि खोडरबराची (डिलीट बटण) ढाल घेऊन त्याचेवर स्वार व्हा आणि या कथायुद्धाच्या मैदानात शाब्दिक फटकेबाजी करायला दाखल व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीसासहित “कथा सम्राटचे” सिंहासन! आणि हो, “कथा सेनापती” आणि “कथा वजीर” यांनाही मिळणार खास सन्मानपत्र!

 • देशभक्ती कथा

 • विज्ञान काल्पनिक कथा (परग्रह, ब्लॅक होल, वॉर्म होल, एलियन्स, व्हायरस, काल प्रवास वगैरे)

 • वैद्यकिय कथा (डॉक्टर, मेडिकल, हॉस्पिटल क्षेत्राशी संबंधित)

 • मैत्री कथा (शाळा कॉलेज वगैरे)

 • बालकथा (लहान मुलांसाठी कथा)

 • बोधकथा (कथेच्या शेवटी काहीतरी बोध असेल)

 • संस्कार कथा (चांगले संस्कार रुजवणारी कथा)

 • विनोदी कथा (वाचकांना खळाळून हसायला लावणारी हास्यकथा)

 • प्रेमकथा (यशस्वी किंवा फसलेले प्रेम)

 • पाऊसकथा (पावसाशी संबंधित कथा)

 • ऑफिसकथा (आजच्या आधुनिक कॉर्पोरेट जगतातील कामाच्या ठिकाणी घडत असलेल्या कथा)

 • अरिष्ट किंवा आपत्ती कथा (जसे प्रचंड भूकंप, किंवा ज्वालामुखी किंवा वादळ आले त्यावेळेस घडणाऱ्या घटना)

 • अपहरण कथा (अपहरणाशी संबंधित कथा)

 • युद्धकथा (युद्धांवर आधारित काल्पनिक कथा)

 • प्रेरणा कथा (अशी कथा ज्यामुळे त्यातून अनेकांना चांगल्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल)

 • सुपरहिरो कथा (अद्वितीय शक्ती लाभलेला एखादा सुपरहिरो)

 • रहस्यकथा/थरारकथा (एखादा गुन्हा आणि त्याची शेवटी होणारी उकल वगैरे, डिटेक्टीव्ह, पोलीस तपास कथा, सीआयडी, सीबीआय, RAW, भारतीय गुप्तहेर वगैरे)

 • सायकॉलॉजीकल थ्रिलर कथा (यातील पात्रे ही अस्थिर मनाची, भास होणारी किंवा संभ्रमात वावरणारी असावीत)

 • शोधकथा (एखादा खजिना किंवा एखादी हरवलेली वस्तू व्यक्ती आणि त्यांचा शोध)

 • भूतकथा (यात भूताचे अस्तित्व आवश्यक असेल)

 • भयकथा (ज्यात प्रसंग वाचतांना वाचकांना भीती वाटली पाहिजे पण प्रत्यक्षात भूत असलेच पाहिजे असे आवश्यक नाही)

 • गूढकथा (ज्यात विविध गूढ घटनांची मालिका असेल पण प्रत्यक्षात भूत असलेच पाहिजे असे आवश्यक नाही आणि प्रसंग वाचतांना वाचकांना सतत गूढता जाणवली पाहिजे)

 • सूडकथा (एखाद्याने घेतलेला सूड किंवा बदला)

 • चातुर्यकथा (चतुराईने एखाद्या परीस्थितीवर कुणीतरी केलेली मात, बिरबलसारखे एखादे पात्र)

 • ऐतिहासिक काल्पनिक कथा (कथा इतिहासात घडणारी पण काल्पनिक हवी)

 • पौराणिक काल्पनिक कथा (कथा पुराणातील वाटली पाहिजे पण काल्पनिक हवी. पात्रे ठिकाणे, नावे सर्व काल्पनिक हवे)

 • फँटसीकथा (अद्भुत कथा म्हणजे या जगात अस्तित्वात नसलेल्या काही गोष्टी, पात्र, ठिकाणे वगैरे)

 • साहसकथा (एखाद्या धोक्याच्या ठिकाणी एकट्याने किंवा अनेकांनी जाऊन साध्य केलेले किंवा मिळवलेले काहीतरी)

 • कूटकथा (कथेचा प्रवाह असा असावा की त्यातील प्रसंगांत नेमकं जे घडतंय ते जसं दिसतंय तसं नसणार आहे आणि हे शेवटी समजेल!)

 • धक्काकथा (कथेच्या शेवटी वाचकांना एकदम अनपेक्षित धक्का बसेल अशी कथा)

 • मनोरंजन कथा (फक्त वाचकांचे मनोरंजन करण्यासाठी लिहिलेली कथा ज्यातून काही बोध घेण्यासारखे असलेच पाहिजे असे नाही)

comments powered by Disqus