फार्मासिस्टची नैतिक तत्वे - आशिष कर्ले

फार्मासिस्टची नैतिक तत्वे - आशिष कर्ले

नैतिक तत्वे (ethics) हे असे नियम असतात जे व्यासायला योग्य प्रकारे चालवतात व त्यातील सदस्यांना कर्तव्याबाबत जागृत ठेवतात. व्यवसायातील नैतिक तत्वांवरून त्या व्यवसायाचा दर्जा, सेवा पुरवण्याची कार्यक्षमता कळून येते.

औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) हे वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्वपूर्ण व्यवसाय आहे जो रुग्णांना औषधनिर्मिती व औषध पुरवठा या महत्वच्या सेवा पुरवतो. समाज सेवा करण्यासाठी हे एक प्रभावी क्षेत्र आहे.

रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा मिळाव्यात व आपल्या कर्तव्याबाबत फार्मासिस्टने एकनिष्ठ व प्रामाणिक राहावे आणि फार्मसी प्रोफेशन सुयोग्य पद्धतीने चालावे म्हणून फार्मासिस्टसाठी काही नैतिक तत्वे आहेत.

१) फार्मसिस्टने त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेणे चांगली वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावेत.
२) आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय सेवा पुरवण्यात त्याने सदैव तत्पर राहावे.
३) फार्मसी स्टोअर मध्ये फक्त पात्र व अधिकृत परवानाधारक फार्मासिस्टनेच औषधनिर्मिती, औषधवितरण करावे, वैद्यकीय सेवा पुरवणे व संपूर्ण स्टोअरमध्ये नियंत्रण ठेवावे.
४) फार्मासिस्ट सोडून इतर कोणत्याही व्यक्तीने औषधनिर्मिती, औषध वितरण करणे बेकायदेशीर आहे.
५) फार्मसी स्टोअरचे आशा पद्धतीने नियोजन करावे जेणेकरून औषध निर्मिती, औषध वितरण व इतर वैद्यकीय सेवा पुरवताना, अस्वछता, अपघात व नुकसान होण्याची शक्यता कमीत कमी राहील व अधिक चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा पुरवता येतील.
६) फार्मसी स्टोअर रचना आशा प्रकारे करावे ज्याद्वारे फार्मसी व्यासाचे प्रोफेशनल प्रतिबिंब उमटेल.
७) औषधनिर्मिती व औषधवितरण करताना नेहमी स्वच्छ पांढरा शुभ्र apron परिधान करावा जो आपल्या सुरक्षिततेसाठी आहे शिवाय ज्याद्वारे लोकांच्या नजरेत एक प्रोफेशनल लूक निर्माण होतो.
८) फार्मासिस्टने काळजीपूर्वक औषधयोजनेची सत्यता व वैधता तपासावी आणि त्यानंतरच औषधवितरण करावे.
९) औषधवितरणासाठी आलेल्या औषधयोजनेतील योग्य अयोग्य गोष्टीबाबत रुग्ण तसेच इतर व्यक्तीसोबत चर्चा करू नये
१०) औषधयोजनेतील औषधवितरण करत असताना चेहऱ्यावर असे कोणतेही हावभाव, तसेच असे कोणतेही वक्तव्य करू नये ज्यामुळे आजार, उपचार, औषधयोजना तसेच डॉक्टरांच्या कार्यक्षमतेबाबत रुगणांच्या मनात शंका निर्माण होईल.
११) औषधयोजनेमध्ये व्यक्तिगत कोणतेही बदल करू नयेत
१२) जर औषधयोजनेमध्ये काही त्रुटी असतील तर त्यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा करून योग्य ते बदल सुचवावेत. रुग्णासमोर असे कोणतेही वक्तव्य करू नये ज्यामुळे डॉक्टरांच्या व्यवसायिकतेवर गदा येईल.
१३) रुगणांसमोर असे कोणतेही वक्तव्य करू नये ज्याद्वारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे विशिष्ट डॉक्टर तसेच औषध कंपनीची जाहिरात अथवा हानी होईल.
१४) फार्मसिस्टने रुग्णांना विशिष्ट डॉक्टरकडे जावे असे सांगू नये त्यासंदर्भात केवळ तो सुचवू शकतो अथवा सल्ला देऊ शकतो.
१५) औषधनिर्मिती व औषधवितरण करताना औषधातील घटक हे पूर्ण शुद्ध असावे, वजन, घनता व इतर गुणवैशिष्ट्यांमध्ये अचूकता असावी.
१६) रुगणांचे आरोग्य या गोष्टीला प्रथम प्राधान्य द्यावे.
१७) कमीत कमी प्रोफेशनल चार्ज, कमीत कमी नफा व अधिक चांगली वैद्यकीय सेवा पुरवावी.
१८) आपल्यासोबतच्या कनिष्ठ फार्मासिस्टमध्ये चांगली व्यावसायिक कैशल्य निर्माण व्हावी म्हणून मार्गदर्शन करावे.
१९) आपत्कालीन स्थितीत आपल्या आजूबाजूच्या फार्मासिस्टसोबत स्पर्धात्मक भावना न ठेवता मदतीस तत्पर राहावे.
२०) योग्य औषध, योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि रूग्णांना परवडणाऱ्या किमतीत पोहचवणे हे आपले कर्तव्य फार्मसिस्टने लक्षात ठेवावे.
२१) रुग्णांना औषध वापरासांधर्भात मार्गदर्शन, आरोग्यसांधर्भात मार्गदर्शन, रुग्ण समुपदेशन करावे.
२२) आरोग्यसांधर्भात रुगणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम करावेत
२३) रुगणांच्या आरोग्यासाठी इतर सर्व वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या व्यवसायिकांसोबत सहकार्याच्या दृष्टीने काम करावे.

We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.

[ लेखकाचा पत्ता: आशिष अरुण कर्ले, गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई); मोबाईल – ९७६५२६२९२६ ]
ईमेल : ashishkarle101@gmail.com


comments powered by Disqus