धनी – मोहन वायकोळे, बोईसर

धनी – मोहन वायकोळे,  बोईसर

mohanwaykole@yahoo.com 9537909375

कौतुकाचे धनी, झाले बेईमान,
कोणते प्रमाण, फितुरीचे…!

हाताशी चमचे, मानाचे सोहळे,
निष्ठावंत पोळे, नेहमीच…!

संधिसाधू थोर, सट्टयाचा प्रयोग,
कोणता नियोग, अंतरीचा…!

दगडा शेंदूर, फासे हळूवार,
छळ जोरदार, जाणिवांचा…!

सर्व चराचरी, देवाचे वैभव,
जाण परातत्व, मानवा रे…!