कविता: काय मी शोधत गेलो ? प्रा.गायकवाड विलास
आसवांत मी नहात गेलो , दुनियेला असा पाहत गेलो .
रंग दुनियेचे ते पाहूनी , विचारांत मी बुडत गेलो .
माणसांत या आजच्या , कालचा माणूस मी शोधीत गेलो.
द्वेष,मत्सर,स्वार्थाचीच बीजे, पाहूनी मीच पुरता खचत गेलो .
माणूसकी शोधावया मी , माणसांच्या त्या गर्दीत गेलो .
का बदलली एवढी मनं ? याचाच शोध मी घेत गेलो .
दिशा दिशा होत्या काळवंडलेल्या, अन् नीतीचा प्रकाश मी शोधत गेलो .
आजच्या याच विश्वात मी , या कसल्या निरपेक्ष आशा ठेवत गेलो .
कालच्या त्या तिरंग्याकडे आज पाहूनी , असा मी माझ्याच आसवांत संपत गेलो .